Why Maratha wants reservation?

Why Maratha wants reservation?

मराठा आरक्षणाची गरज का भासू लागली? Why Maratha wants reservation?

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वी कडे चर्चेचा विषय बनला आहे. राजकारणी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षण लागू होण्याचे प्रयत्न सर्व करत आहेत याचा सर्व दिखावा सुरु झाला आहे. मराठा आरक्षण साठी काहीही खटपट ना केलेलं देखील आता ” आम्ही दिलेला शब्द पळाला “, “वचनपूर्ती”, असे टॅग लाइन वाले जाहिराती लोकांच्या माथी माऱ्याच्या तयारीत आहेत. सोशल मीडिया वर मराठा आणि दलित समाजातील कार्यकर्त्यानमध्ये यांत नेट युद्ध चालू आहे. दलित समाज आता मराठा समजला विचारू लागला आहे कि “इतकी वर्षे रुबाबात ‘आम्ही मराठा ९६ कुळी’ ,’आम्ही वरिष्ठ जातीतले’ असे म्हणणारे आता मागासवर्गीय आरक्षणाची भीक का मागताय? ” मराठा आरक्षणाची गरज का भासू लागली? Why Maratha wants reservation?

कोण आहेत मराठा समाज ?

मराठा समाज हा प्रामुख्याने क्षत्रिय समाज. मराठा समाज हा प्रामुख्याने लष्कर आणि शेतीशी संबंधीत आहे. पूर्वीच्या काळी मराठे एकतर सैन्यात भरती होत होते किंवा नाही तर मग शेतात शेतकरी म्हणून कार्यकारत होते. मराठ्यांचा शेती प्रामुख्याने व्यवसाय होता आणि त्यातून उत्पन्न हि भरघोस होते. शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती. सुरवातीपासून राजकारण हा मराठ्यांचा आवडीचा विषय होता. अनेक जण राजकारणात गुंतले होते.

त्या वेळेस शिक्षणातील आणि नोकरीतील आरक्षणाचा मराठ्यांवर काही परिणाम होत न्हवता. त्यावेळेस मराठ्यांनी फक्त शेती, सहकारी कारखाने, आणि राजकारण या मध्ये जास्त लक्ष्य केंद्रित केले होते. राजकारण, सहकारी संस्था, साखर कारखाने या मध्ये मराठ्यांना फार यश मिळाले आणि अजूनही टिकून आहे. पण हे यश फक्त काही मर्यादित लोकांन मिळाले. या लोकांच्या यशाने बाकीचे मराठा समाज झाकला गेला. त्यांच्या व्यथा आणि आर्थिक परिस्थिती समोर आली नाही.

महाराष्ट्रातील अनेक जमीनदार, बागायतदार, तसेच राज्यात सत्तेसोबतच शिक्षणसम्राट, उद्योगमहर्षी, सहकारसम्राट, साखरसम्राट, यासारखी सम्राटांची बिरूदावली मराठा समाजाकडेच आहे. असे जरी असले तरी एकूण मराठा समाजाच्या फक्त अंदाजे ३०% लोक हि आर्थिक दृष्ट्या चांगल्या स्थितीत आहे.या सर्व लोकांना आरक्षणाची गरज नाही त्यामुळे या लोकांनी कधी बाकीच्या आपल्या समाज बांधवासाठी कधी प्रयन्त केले नाही . बाकीचे ७०% मराठा लोकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. यातील अनेक जण शेतीवर आपली उपजीविका करतात.

आता का गरज लागू लागली आहे मराठयांना आरक्षणाची ?

Why Maratha wants reservation?

आता काळ बदलला. वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकरणामुळे , शेती हा व्यवसाय मागे पडला, गावांच्या आणिशेतीच्या प्रगती कडे सरकारचे दुर्लक्ष होऊ लागले. शेती आहे पण पाणी नाही, सवलती नाही, बाजारभाव नाही, नैसर्गिक आपत्ती आहे, दलालांची फसवणूक आहे या सर्व गोष्टी मुळे हा शेतीवर उपजीविका करणार समाजाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे.

घरची परिस्थिती बेताचे त्याचे शिक्षणात, नोकरीत आरक्षणाची कुबडी नाही त्यामुळे या समाजातील मुलें हि इतर समाजातील मुलां पेक्षा मागे पडू लागली आहे. एकेकाळी प्रतिष्टीत असलेला शेती व्यवसाय आणि शेतकरी आता दुर्बल झाला आहे. शेतकरी आत्महत्या करू लागला. गावे आता ओस पडू लागली आहेत सर्व लोक आता उदरनिर्वाह साठी शहराकडे धावू लागली आहेत. मिळेल ते खाऊन आणि मिळेल तिथे राहु लागली आहेत.

राजकारणाशी जुळलेला मराठा समाज फार श्रीमंत झाला, तसेच शहरीकरण आणि औद्यगिकरणात सहभागी झालेला मराठा समाजातील लोकांची परिस्थिती ठीक ठाक राहिली पण फक्त शेतीवर अवलंबून असलेला मराठा समाजाचा एक मोठा वर्ग दारिद्र रेषे खाली गेला. आणि याच मराठा समाजातील शेतकरी आणि इतर बेरोजगारांना जर आता प्रगतीचा वाटेवर न्यावयाचे असेल तर आरक्षणाची गरज नक्कीच लागेल.

आरक्षणाची गरज कशा साठी ?

एकूणच काय मराठ्यांना आरक्षणाची गरज हि मागासवर्गीय म्हणून न्हवे तर त्यांच्या दारिद्र रेषेखालील (आर्थिक निकषावर) बांधवाना प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आहे. शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे एकेकाळी प्रतिष्टीत असलेला शेती व्यवसाय आणि शेतकरी आता दुर्बल झाला आहे. या दुर्बल घटकाला जर पुढे आणायचे असेल तर आरक्षणाची गरज नक्की आहे

 

मी माझे म्हणणे या लेखामध्ये मांडले आहेत. माझी तुमच्या सर्व वाचकांना विनंती आहेत कि तुम्ही तुमची मते खाली कंमेंट मध्ये टाका. जेणे करून पुढच्या वाटचालीत आपल्याला काय काय कार्याचे आहे याचे मार्ग सापडेल.

-Santosh

1 thought on “Why Maratha wants reservation?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top