Who will be the CM of Maharashtra in 2019?

Who will be the CM of Maharashtra in 2019?

Who will be the CM of Maharashtra in 2019?  (२०१९ मध्ये कोण बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? )

लवकरच २०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापू लागले आहेत. राजकीय घडामोडीना वेग येऊ लागला आहे, कार्यकारणत्यांची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. विरोधकांचा आणि सत्ताधारी केलेल्या घोटाळ्यांचा आणि न केलेल्या कामांचा बाबतीत एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. मीडिया वाले सत्ताधारी आणि विरोधक यांचा जंगी सामने लावून चांगले टी आर पी मिळवत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये हि आता तू तू में में चालू झाली आहे. मी कट्टर शिवसैनिक, मी कट्टर राजसैनिक, मी कट्टर मोदी भक्त., मी गांधी भक्त.. अशा सोशल मीडियावर अनेक जोक्स अनेक कानपिचक्या आणि टोमणे ट्रोल होत आहेत. शिवसेनेचा स्वबळाची नारा आणि मोदी विरोधी घोषणांचा गाचा गुंडाळून त्यांना परत एकदा युती मध्ये सामील करण्यात भाजप आणि देवेंद्र जी यशस्वी झाले. शिवसेनेच्या या धर सोड वृत्तीचा काय लोकांवर परिणाम होईल माहित नाहीत पण २०१९ ची निवडणूक खरोखर आता रंगात येत आहे.  अनेक वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया पेजेस वर आता २०१९ मध्ये कोण बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?   Who will be the CM of Maharashtra in 2019? या वर चर्चसत्र आणि पोल्स घेतले जात आहेत.

सामान्य माणूस फक्त हे सर्व निमूटपणे बघत आहेत .दरवेळे प्रमाणे या वेळेस हि सामान्य माणसाचे काहीही भले झाले नाही. महागाई कमी झाली नाही, रस्ते चांगले नाहीत, पाणी नाही, नेहमीच तीच ट्रेन ची गर्दी आणि नेहमीचे ट्रॅफिक. सामान्य माणूस फक्त सहन करत असला तरी त्याच पक्षाला किंवा उमेदवाराला परत निवडून देण्यास हि तो तयार असतो कारण त्याचे त्या पक्षाशी भावनिक नाते जुळले असते. आपापल्या मंडळाची/सोसायटीची  काही कामे आपल्या उमेदवार करतो यात त्याला समाधान असते.त्यामुळे प्रत्येक पक्षाला याची जाणीव असते त्यामुळे ते निर्धास्त असतात आणि पुढची निडणूक आम्हीच जिकणार याची प्रत्येकाला खात्री असते.

२०१९ मध्ये खरंच असे होणार का? लोक घोटाळे बाज, कामचोर आणि नावापुरते संडास,रस्ते, शेड्स, बसण्याची आसने बांधून देऊन बाकीची महत्वाची कमी न करणाऱ्या उमेदवारांना परत निवडून देणार का?  एकमेकांवर चिखलफेक करून नंतर एकत्र येणाऱ्या पक्षांना मते देणार का ?कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री बनणार? Who will be the CM of Maharashtra in 2019?    चला बघूया मुख्यमंत्री कोण बनू शकते…

मुख्यमंत्री पदाचे दावेदार :

भाजप

 1. श्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadvanis) Devendra Fadanvis

देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सध्याचे महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून कार्य सांभाळत आहेत. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून डी. एस. इ. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे. राजकारण हे सामाजिक, आर्थिक बदल घडवून आणण्याचे एक साधन आहे असा मा. मुख्यमंत्री महोदयांचा दृढ विश्वास असून, आजपर्यंतची त्यांची २५ वर्षांची राजकीय कारकिर्द पाहता त्यात त्यांची हीच विचारधारा ठळकपणे दिसून येते. देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ट वक्ते आहेत. २०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांची भाषणे फार प्रभावित करणारी होती आणि त्याचा फायदा त्यांना झाला.  शिवसेनेवर चिखलफेक करून नंतर त्यांच्याशी गोड बोलून युती साधण्याची कला याना जमली.

सत्तेत आल्यानंतर विरोधकांनी त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, आरक्षण प्रश्नावर, नोटबंदीच्या प्रशांवर, महागाई वर नेहमी आगपाखड केली पण मुख्यमंत्री साहेबानी सर्वाना आश्वासने देत सर्वांची तोंडे बंद केली.

शिवसेनेने  त्यांच्या सत्तेत बरोबर असूनही अनेकदा विरोधकांची भूमिका घेतली. पण देवेंद्र जी नि शिवसेनेच्या आमदारांचे राजीनामे खिशातून बाहेर येऊ दिले नाहीत. शिवसेनेचा स्वबळाची नारा आणि मोदी विरोधी घोषणांचा गाचा गुंडाळून त्यांना परत एकदा युती मध्ये सामील करण्यात देवेंद्र जी यशस्वी झाले. आता या वाटाघाटी मुळे त्यांना मुख्यमंत्री परत बनता येईल कि परत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनण्याचा हट्ट त्यांना पुरवावा लागेल हे अजून स्पष्ट नाही .. तो पर्यंत देवेंद्र जी मुख्यमंत्र्यांची शर्यतीत नक्की आहेत.

आता भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी किती आश्वासने पूर्ण केली आणि काय कामे केली आहे हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे आता जनता ठरवेल २०१९ मध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार का? Can Devendra Fadvanis became a CM of Maharashtra in 2019?.

इतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार

 • श्रीमती पंकजाताई मुंढे
 • श्री नारायण राणे

शिवसेना  

श्री उद्धव ठाकरे (Mr. Uddhav Thackeray)uddhav thackeray

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. माननीय बाळासाहेबांचे सुपुत्र,  बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा सांभाळली. शिवसेनेचे प्रमुख  नेते श्री नारायण राणे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री राज ठाकरे यांच्याशी श्री उद्धवजी यांच्या बरोबर झालेल्या वादांमुळे ते फार चर्चेत आले. नारायण राणे यांनी काँग्रेस मध्ये आणि आता भाजप मध्ये प्रवेश केला तर त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. अनेक लोकांच्या मते श्री राज ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष बनावे अशी इच्छा होती पण माननीय बाळासाहेबांनी श्री उद्धव जी ठाकरे यांच्या कडे शिवसेनेचे नेतृत्व सोपवले.

उद्धवजी कडे साहेबानं सारखा कणखर पणा आणि रोखठोक पणा नाही. पण उद्धवजी कडे संघ बांधणीचे उत्तम कौशल्य आहे. त्यांच्या या कौशल्य मूळे आता पर्यंतच्या त्यांच्या राजकारणात त्यांना यश मिळाले आहे. त्यांना त्यांच्याकडे निकटवर्ती असलेल्या सहकारी यांची उत्तम साथ लाभली आहे.

२०१९ ची निवडणूक उद्धवजी साठी परीक्षेचा काळ असणारा आहे. मागच्या निवडणुकीत भाजपच्या विरुद्ध बोलून मत घेतली आणि नंतर मग भाजपशी युती केली. गेल्या ४ वर्षात शिवसेनेने भाजपवर खालच्या दर्जाला जाऊन टीका केली. स्वतः उद्धवजी भर सभेत स्वबळाची शपथ घेतली आणि भाजप शिवाय शिवसेनेचे सरकार अनु आहे घोषणा केल्या तर दुसरीकडे संजय राऊत यांनी तर सामानाच्या अग्रलेखातून भाजप आणि मोदी सरकार वर टीकेची मालिकाच चालू केली होती. हे सर्व होताना लोकांना माहित होते कि कितीही झाले तरी युती होणारच… आणि हो तसेच झाले उद्धव जी  चा स्वबळाचा नारा फोल ठरला आणि फक्त सत्ते साठी त्यांनी परत एकदा घूम जावं केले. शिवसैनिक जरी म्हणत असले कि साहेबानाचा आदेश सर्व मानतील तरी मनातून अनेक शिवसैनिक दुखी झाले आहेत. या सर्वांचा आता सकारत्मक प्रभाव पडतो कि नकारत्मक पडतो ते बघूच…

भाजपाची हातमिळवणी करून याचा फायदा उद्धवजीना होणार का?   श्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार का? Can Uddhav Thackeray became a CM of Maharashtra in 2019?.

इतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार

 • श्री संजय राऊत
 • श्री सुभाष देसाई

काँग्रेस

श्री पृथ्वीराज चव्हाण (Mr. Pruthviraj Chavhan)prithviraj chavan

पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री (१७ वे)  आहेत . चव्हाण यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि अँड सायन्स मधून पदवीधारक आहेत. तसेच त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मधून मेकॅनिकल इंजिनीरिंग केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या बद्दल आदर आणि फार मोठे स्थान आहे. त्यामुळे कोसळल्या कॉग्रेस ला सावरण्याचे काम ते करू शकतील अशी अशा वाटते.

जर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस मधला असंतोष दूर करून एक चांगली संघटना उभी केली आणि जर मोदी आणि देवेंद्र जी वर तोफ डागण्यात यशस्वी झाले तर पृथ्वीराज चव्हाण परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात. संजय निरुपम ची वादग्रस्त विधाने काँग्रेस साठी डोक्याला ताप ठरली आहेत. त्यातच मुंबई काँग्रेस मध्ये असलेले वाद विवाद त्यामुळे संघटना बांधणीत फार अडचणी येणार आहेत. २०१९ ची निवडूंक काँग्रेस साठी अग्नीदिव्यातून जावे लागणार आहेत. त्यांच्या कडे राष्ट्रवादी शी युती केल्याशिवाय काही पर्याय नाही. आता जनताच ठरवेल श्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार का? Can  Mr Pruthviraj Chavhan became a CM of Maharashtra in 2019?.

इतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार

 • श्री अजित पवार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

श्री राज ठाकरे (Mr Raj Thackeray)

RAJ thackeray

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष व संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. पण बाळासाहेबांनी श्री उद्धव जी ठाकरे यांच्या कडे शिवसेनेचे नेतृत्व सोपवले. महाराष्ट्रात सर्व नेत्यांपैकी गुगलवर सर्वात जास्त सर्च होणारे नेते म्हणून इंटरनेटच्या विश्वातही राज यांचा दबदबा आहे. राज ठाकरे हे तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. असे म्हटले जाते कि महाराष्ट्रातील मराठी नागरिक जास्तित जास्त अपेक्षा राज ठाकरे या व्यक्तीकडून ठेवतात. सध्याचा काळात राज ठाकरे हे देशातील सर्वोत्तम ३ व्यक्त्यांमध्ये मोडतात.  त्यांची भाषण शैली मा.बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देते.

.”जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवायचाय” हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. राज ठाकरे हे कधीच हार न मानणाऱ्यांपैकी एक ओळखले जातात.त्यांचा पक्षाचा एकमेव आमदार असतानाही ज्याप्रकारे राज ठाकरे हे काम करतात व सत्ताधाऱ्यांनाही धडकी भरवतात अशी आज त्यांची ओळख आहे.

राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर त्यांच्या परप्रांतीय आंदोलनामुले  देशभरातून टीका होत असते. पण राज ठाकरे कोणालाही न जुमानता त्यांना जे बोलायचे आहे ते बोलत राहतात. त्यांच्या याच रोख ठोक पण मुळे त्यांचे लाखो तरुण समर्थक आहेत. मनसे पक्षाला सुरवातीच्या काळात चांगले यश मिळाले. पण हे यश त्यांना टिकवता आले नाही. श्री राज ठाकरे याना पक्ष बांधणी करण्यात थोडे अपयश आले. अनेक आमदार आणि नगरसेवक दुसऱ्या पक्षात पळून गेले. नाशिक मध्ये चांगले काम करूनही लोकांनी त्यांना सत्ते पासून दूर ठेवले. पण तरीही ते डगमगले नाहीत. २०१९ साठी त्यांनी मोर्चा बांधणी सुरु केली आहे. सोशल मेडिया वर त्यांचे लोकहो समर्थक प्रचाराला उतरले आहेत.

आता प्रश्न असा आहे कि फक्त मराठी मतांवर मनसे सत्तेत येणार का? राज ठाकरे यांच्या सभेला होणारी गर्दी आणि सोशल मीडिया वरील त्यांचा दबदबा मतदान मध्ये मिळणार का?  श्री राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार का?   Can  Mr Raj Thackeray  became a CM of Maharashtra in 2019?

राज ठाकरे यांच्या बद्दल महाराष्ट्रातील  सामान्य लोकांना काय वाटते ?

What do common people of Maharashtra think about Raj Thackeray? 

कृपया तुमच्या प्रतिक्रिया द्या. तुम्हाला कोण मुख्यमंत्री म्हणून हवे आहे. ते खाली कंमेंट बॉक्स मध्ये टाका. पोल वर तुमच्या आवडत्या व्यक्ती ला मते द्या.

Coming Soon
२०१९ मध्ये कोण बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
२०१९ मध्ये कोण बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
२०१९ मध्ये कोण बनणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

 

 

 

 

   

67 thoughts on “Who will be the CM of Maharashtra in 2019?

 1. 19 व्या मुख्यमंत्री फक्त राज साहेब ठाकरे….
  2019 वाट बघतो….
  जय मनसे…

 2. राज साहेब ठाकरे कारण आताच्या घडीला महाराष्ट्रात दूरदृष्टी व महाराष्ट्राच्या हिताचा वीच्यार हे राज साहेब करत आहेत बाकीचे तिघे स्वतःच्या पक्षाचा व स्वतःच्या पक्षातील नेत्यांचा वीच्यार करताना दिसतात पण राज साहेब हे मराठी जनतेचा वीच्यार करत आहेत जर महाराष्ट्रात मनसेचा मुख्यमंत्री बसला तर निश्चितच मराठी माणसाचे सोनेरी दिवस व शिवशाही आलेली दिसेल
  *ना जात पात असेल ना धर्म पंत असेल
  *असेल तो फक्त महाराष्ट्र धर्म व मराठी समाज
  *असेल ते फक्त शिवाजी महाराजांचे बळ व बाबासाहेबांचे वीच्यार

 3. २०१९ चे मुख्यमंत्री हे राज साहेबच होणार कारण जनतेने ह्या सर्व पक्षाच्या नेत्यांना निवडुन दिली पण जनतेचा विचार कोणीही केला नाही म्हणून आताचे मुख्यमंत्री हे @#राज साहेबच असणार आहेत बाकी कोणीही होऊ शकत नाही #जय शिवराय

 4. महाराष्ट्रा चा पूर्ण आराखदा तयार आहे मा. राज साहेब यांच्या कड़े.

 5. माझे एकच साहेब राज साहेब ठाकरे 🇨🇷 🇨🇷 🇨🇷

 6. ज्यांच्या नरजेत ह्या अखंड महाराष्ट्राची दूरदृष्टी आहे,
  मराठी हृदयसम्राट मा. श्री. राजसाहेब ठाकरे 😍❤️

 7. महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा!
  याप्रमाने अगदी प्रामाणिक राजकारण करत आहेत, कोणत्याही पक्षाला नख लावून कार्यकर्ते, नेते न फोड़ता, सामान्य कार्यकर्त्यांमधुन सर्व पदाधिकारी, नेते घडवत आहेत. उद्या महाराष्ट्राचे जर मंत्रिमंडळ बनवायची वेळ आली तर यातूनच विभाग निहाय मंत्री दिले जातील.
  साहेब, आम्हाला सामान्य मतदाराना तुमचा अभिमान आहे!

 8. फक्त राजसाहेब ठाकरे

  कारण महाराष्ट्रात सध्या दूरदृष्टी आणि कणखर असलेले एकमेव ते एकमेव नेतृत्व आहे… राज्यातील विविध समस्यावर त्यांचा सखोल अभ्यास आहे… सत्तेत नसतानाही त्यांची राज्यातील शासकीय वर्गावर उत्तम पक्कड आहे. जातपात या विषयात न अडकणारे ते एकमेव नेते आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top