What do common people of Maharashtra think about Uddhav Thackeray?

What do common people of Maharashtra think about Uddhav Thackeray?

What do common people of Maharashtra think about Uddhav Thackeray? श्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल महाराष्ट्रातील  सामान्य लोकांना काय वाटते ?

 

श्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. माननीय बाळासाहेबांचे सुपुत्र,  बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची धुरा सांभाळली. शिवसेनेचे प्रमुख  नेते श्री नारायण राणे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री राज ठाकरे यांच्याशी श्री उद्धवजी यांच्या बरोबर झालेल्या वादांमुळे ते फार चर्चेत आले. नारायण राणे यांनी काँग्रेस मध्ये आणि आता भाजप मध्ये प्रवेश केला तर त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. काही लोकांच्या मते श्री राज ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष बनावे अशी इच्छा होती पण माननीय बाळासाहेबांनी श्री उद्धव जी ठाकरे यांच्या कडे शिवसेनेचे नेतृत्व सोपवले. आणि आता पर्यंत साहेबानी घेतलेल्या निर्याणाला उद्धवजींनी स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. या लेखात आपण जाऊन घेऊया कि श्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल महाराष्ट्रातील  सामान्य लोकांना काय वाटते? What do common people of Maharashtra think about Uddhav Thackeray?

uddhav thackeray

उद्धवजी कडे साहेबानं सारखा कणखर पणा आणि रोखठोक पणा नाही. पण उद्धवजी कडे संघ बांधणीचे उत्तम कौशल्य आहे. त्यांच्या या कौशल्य मूळे आता पर्यंतच्या त्यांच्या राजकारणात त्यांना यश मिळाले आहे. त्यांना त्यांच्याकडे निकटवर्ती असलेल्या सहकारी यांची उत्तम साथ लाभली आहे.

उद्धवजी कडे राजकारणात जरुरी असलेला चाणाक्ष पणा आहे. परिस्थतीती नुसार पक्षाची दिशा ठरवण्याची तारेवरची कसरत उद्धवजी आतापर्यंत यश्वस्वी रित्या करत आले आहेत. सरकारमध्ये राहुन सरकारवर टीका करणे आणि आपले अस्तित्व लोकांपर्यंत पोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

सध्या गाजत असलेले अयोध्यातील राम मंदिर प्रश्नावरून उद्धवजी फार प्रसिद्धी मिळत आहे. अनेक पक्ष आता राम मंदिर प्रश्नावर पुढे येऊ लागले आहेत. २५ नोव्हेंबर ला उद्धवजी अयोध्याला जाणार आहेत त्यांना मिळणार प्रतिसाद पाहून सर्व पक्ष हादरून गेले आहेत. 

उद्धवजी यांची राजनीती काही शिवसैनिकांनाही संभ्रमात पाडते पण  तरीही शिवसैनिक हा उद्धवजी वर विश्वास काय ठेवून आहे. बाळासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी सांगितले होते कि ” माझ्या उद्धव ला सांभाळा”.त्यामुळे साहेबांचा शब्द आणि उद्धवजी वरचा विश्वास कधी तुटणार नाही.  साहेबांवरची अपार भक्ती आणि प्रेम याच्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिक यांचे नाते कधी तुटू शकत नाही.  शिवसेनेची उद्धवजी सोबत असलेली मंडळी तसेच त्यांचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख , गट प्रमुख, आणि शिवसैनिक कार्यकर्ते यांचे व्यवस्थापन फारच चांगल्या पद्धतीचे आहे त्यामुळे भाजप सारखा पक्ष शिवसेनेशी युती जुळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. आता उद्धवजी भाजप वाल्यांशी युती करतील का नाही हे आताच सांगणे कठीण आहे कारण उद्धवजी हे परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेतात त्यामुळे आता काही  सांगणे कठीण आहे.

उद्धवजी कडे साहेबांसारखा रोखठोक पणा , वक्तृत्व कौशल्य नसले तरी ते एक पक्ष प्रमुख म्हणून त्यांची जवाबदारी फार उत्तम रित्या पार पडत आहेत. शिवसेना संघटना विस्कळीत होऊ नये म्हणून त्यांनी घेतलेली मेहनत नक्कीच जबरदस्त आहेत.

२०१९ मध्ये शिवसेनेचे सरकार येईल कि शिवसेना भाजप युतीचे सरकार येईल हे सांगणे कठीण आहेत आहे पण शिवसेना सत्तेत असेल असे वाटते. कारण शिवसेना आणि भाजपाला टक्कर देण्यास इतर पक्ष अजूनही तयार आहेत असे वाटत नाही. 

मी माझे म्हणणे या लेखामध्ये मांडले आहेत. मी एक सामान्य माणूस आहेत त्यामुळे माझे विचार हे कोणी मोठ्या विचारवंत किंवा मोठ्या प्रतिष्ठित लेखकाचे विचार नाही आहेत. माझी तुमच्या सर्व वाचकांना विनंती आहेत कि तुम्ही तुमची मते खाली कंमेंट मध्ये टाका. जेणे करून पुढच्या वाटचालीत आपल्याला काय काय कार्याचे आहे याचे मार्ग सापडेल.

जय हिंद जय महाराष्ट्र

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top