What do common people of Maharashtra think about Raj Thackeray

What do common people of Maharashtra think about Raj Thackeray

What do common people of Maharashtra think about Raj Thackeray? राज ठाकरे यांच्या बद्दल महाराष्ट्रातील  सामान्य लोकांना काय वाटते ?

२०१९ च्या निवडणूक जवळ आल्या आहेत आणि सर्व पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकांना खोटी आश्वासने देऊन निवडून आलेले पक्ष आता आपण किती आश्वासने पाळली आहेत आणि भारताची प्रगती कशी झाली आहे हे वाढवून चढवून जाहिरातींच्या माध्यमातून दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न जोमाने चालू आहे. दुसरी कडे विरोधक सत्ताधारकांच्या चुका दाखवण्याची तयारी चालू आहे. हा दर वेळेचा खेळ आहे. आम्हाला याची सवय झाली आहे. सामान्य लोकांच्या अपेक्षा कोण पूर्ण करणार माहित नाही. कोणावर विश्वास ठेवावा हेच समझत नाही आहे. या सर्वातून कोणी आशेचा किरण दिसतो तो आहे राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष…. राज ठाकरे यांच्या बद्दल महाराष्ट्रातील  सामान्य लोकांना काय वाटते ?  What do common people of Maharashtra think about Raj Thackeray?

राज ठाकरे

राज ठाकरे यांच्याकडे आजची तरुण पिढी आकर्षित होत आहे. त्यांचे विचार त्यांना पटत आहेत. इतर पक्षांनी दिलेल्या खोट्या आश्वासनच आता कंटाळा आला आहे. राज यांचा “जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचे” स्वप्न आता तरुण मंडळी बघू चागंली आहेत.

सामान्य लोक त्यांच्या कडून ज्या अपेक्षा आहेत ते मी खाली नमूद करत आहे.

१. सर्वप्रथम मुंबई मध्ये जी लोकसंख्या वाढत आहे आणि दररोज लोंढे च्या लोंढे मुंबई आणि महाराष्ट्र कडे येत आहेत त्यामुळे अनेक नागरी समस्या आणि अनधिकृत बांधकामे, अनधिकृत रिक्षावाले, आणि इतर अनेक अनधिकृत धंदे जोमाने वाढू लागले आहेत. यावर कोणी आवाज करू शकतो किंवा लढू शकतो ते फक्त राज आणि त्यांचा पक्ष हे लोकांना आता पटू लागले आहे.

२. अनेक मराठी बेरोजगार तरुण यांनी रेल्वे, मंत्रालय, बँक, आणि इतर महत्वाच्या सरकारी नोकरी मध्ये स्थान मिळावे यासाठी राज काहीतरी पाऊले उचलतील असे वाटते,

३. मुंबई आणि महाराष्ट्रातील रस्ते व्यवस्था पार कोलमडली आहे. रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. नाशिक चे मनसे ने बांधलेले रस्ते अजूनही चांगले आहेत त्यामळे असे चांगले रस्ते राज संपूर्ण महाराष्ट्र करू शकतात असा विश्वास आता लोकांना वाटू लागला आहे.

४. शेतकऱ्यांचा प्रश्न तर फार बिकट आहेत, अनेक समस्या आहेत, दुष्काळ आहे. यावर राज साहेबांकडे काही तरी उपाय आणि मार्ग असतील असे लोकांना आता वाटू लागेल आहे .

५. अवैध फेरीवाले आणि अवैध बांधकाम, आणि महानगर पालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यांबरोबर केलेली आंदोलने लोकांना प्रभावित केले आहे.

६. टोल चा प्रश्न राज संपूर्णपणे सोडवू शकतात.

७. महिलां वरील अत्याचाऱ्याना ला राज यांच्या कडक शासन मिळेल असे वाटते

८. नाशिक मधील त्यांचे कचरा व्यवस्थापनाचे प्रयत्न चांगले होते. असेच चांगले प्रकल्प महाराष्ट्रभर होतील असे लोकांना वाटू लागले आहे.

 

राज साहेबानी काही गोष्टी टाळाव्यात हे देखील मी नमूद करत आहे.

१. त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या विकासवरच जास्तीत जास्त भर द्यावा. शिवसेनेची बदनामी करणे टाळावे कारण शेवटी सगळे भाऊ भाऊ च आहेत.

२. जे आंदोलन सुरु केले आहे ते पूर्ण करावे. मीडिया मध्ये तुमची असलेली “आरंभशूर” हि प्रतिमा दूर करावी.

३. मागच्या निवडूणुकी मध्ये तुम्ही बरेच यु टर्न घेतलेत त्यामुळे अनेक चाहते गोधळले. तसे या निवडूणुकीत झाले नाही पाहिजेत.

४. तिकीट वाटपाच्या वेळी सर्व तुमच्या उमेदवारांना वेळीच विश्वासात घ्यावे आणि त्यांच्या काही समस्या असतील तर त्या सोडवाव्यात  त्यामुळे मागच्या निवडणुकीत जसे शेवटच्या क्षणी अनेक खांदे कार्यकर्ते पैस्या साठी दुसऱ्या पक्षात गेले त्यावर आळा येईल.

५. नाराज कार्यकर्त्याना वेळीच मार्गदर्शन करावे.

६. आपल्या सहकाऱ्यांची फळी मजबूत ठेवावी, त्यांनाही सर्वीकडे पुढे करावे.

७. परप्रांतीय मुद्दा व्यवस्थित मांडावा जेणेकरून हिंदी मीडिया वाले त्याचा चुकीचा अर्थ लावून भोभाट करू शकणार नाहीत.

राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील का ? 

Can RaJ Thackeray became CM of Maharashtra in 2019?

मी माझे म्हणणे या लेखामध्ये मांडले आहेत. मी एक सामान्य माणूस आहेत त्यामुळे माझे विचार हे कोणी मोठ्या विचारवंत किंवा मोठ्या प्रतिष्ठित लेखकाचे विचार नाही आहेत. माझी तुमच्या सर्व वाचकांना विनंती आहेत कि तुम्ही तुमची मते खाली कंमेंट मध्ये टाका. जेणे करून पुढच्या वाटचालीत आपल्याला काय काय कार्याचे आहे याचे मार्ग सापडेल.

10 thoughts on “What do common people of Maharashtra think about Raj Thackeray

 1. महाराष्ट्रत एकमेव नेता राजसाहेब आहेत ज्यांना विकासची दूरदृष्टी आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र साठी त्यांची तळमळ मराठी माणसाला सर्वप्रथम प्राधान्य नोकरी, धंदा महाराष्ट्रत असावे ही भूमिका मला सर्वात जास्त आवडते म्हूण न ते या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे हीच आई जगदंबे कडे प्रार्थना करतो

 2. आता पर्यंत आपण सर्व पक्ष ना अनुभवल आता आणि सगळ्याने आपली वाटच लावली आहे .असं एक ही सरकार नाही जनी मराठी लोकांचे प्रश्न मार्गी लावले रस्ते च प्रॉपलेम आहेच, पाणी पोरब्लेम ,मराठी तरुणाना नोकरीचा आहेच, शेत कार्यनाच प्रॉब्लेम आहेच आता पर्याय एकच आता महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आली पाहिजे, कारण एक मेव नेता असा जो कोणाला ही घाबरत नाही, सत्ता नसताना सुद्धा एक नगरसेवक आणि एक आमदार असून सुद्धा तो आपल्या मराठी भाषा साठी आपल्या मराठी माणसाठी लढतोय . 2/ 12/18 रोजी उत्तर भारतीय मंच वर जाऊन मराठी माणसाची बाजू मांडली हे फक्त राज साहेबच करू शकतात ,म्हणून माझी सर्व मराठी बांधवाना विनंती आहे .2019 ला फक्त मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच द्या.

 3. मी एवढंच सांगू शकतो की। सर्वांना वापरून बघितले।
  एक संधी राज साहेबांना देऊन बघायला काही हरकत नाही। कारण एक तर त्यांच्या कडे महाराष्ट्राची ब्लु प्रिंट आहे। दुसरे म्हणजे नाशिक ला स्वताला सिद्ध करून दाखवले आहे.

 4. मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी सण आणि महाराष्ट्रासाठी फक्त राजसाहेब ठाकरे, बाकी सगळे सत्तेसाठी लाचार झालेत…..

 5. मी एवढंच सांगू शकतो की। सर्वांना वापरून बघितले।
  एक संधी राज साहेबांना देऊन बघायला काही हरकत नाही। कारण एक तर त्यांच्या कडे महाराष्ट्राची ब्लु प्रिंट आहे। दुसरे म्हणजे नाशिक ला त्यांनी स्वताला सिद्ध करून दाखवले आहे।

  Reply

 6. एक संधी राज साहेबांना देऊन बघायला काही हरकत नाही। कारण एक तर त्यांच्या कडे महाराष्ट्राची ब्लु प्रिंट आहे। दुसरे म्हणजे नाशिक ला त्यांनी स्वताला सिद्ध करून दाखवले आहे।

 7. राजसाहेब फक्त महाराष्ट्राच्या विकासाठी,मराठी
  माणसांसाठी लढत आहेत. सत्ता असो किंवा नसो.
  त्यांना एक संधी द्यायला हवी….!!!

 8. मी एवढंच सांगू शकतो की। सर्वांना वापरून बघितले।
  एक संधी राज साहेबांना देऊन बघायला काही हरकत नाही। कारण एक तर त्यांच्या कडे महाराष्ट्राची ब्लु प्रिंट आहे। दुसरे म्हणजे नाशिक ला त्यांनी स्वताला सिद्ध करून दाखवले आहे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top