Jokes in Marathi

Jokes in Marathi

Here you will get good collections of jokes in Marathi .

Jokes in Marathi

Please find below jokes in Marathi .

Jokes in Marathi

तिला भेटलो तर ५०० जातील

प्रचाराला गेलो तर ५०० येतील..

तिला भेटू की प्रचाराला जाऊ?

पुणेरी माणूस: अरे वेड्या, तिला घेऊन प्रचाराला जा १००० मिळतील..


दहावी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले.

बाबा- “वेटर एक बियर🍻 और एक आईसक्रीम🍧 लाओ!!”

मुलगा – “आईसक्रीम का बाबा..??
तुम्ही पण बियर घ्या ना..”

बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू


सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?

सासूबाई: नको बाई, मला कुठे “सात समुंदर “वर नाचता येतंय


जज: बाई, तुला नक्की मुल किती?

बाई: ७
जज: पहिल्याच नाव?
बाई: बाळू

जज: दुसरा?
बाई: त्याच पण बाळू …..सगळे शांत

जज: तिसरा?
बाई: त्याच पण बाळू …….कोर्टात हशा

जज: चवथा?
बाई: त्याच पण बाळू ….सन्नाटा…….जज चिडले

जज: पाचवा?
बाई: त्याच पण बाळू ………..सारे अस्वस्थ

जज: सहावा?
बाई: त्याच पण बाळू …….जज संतापून लालबुंद…….

जज: आणि सातवा?
बाई: त्याच पण बाळू ……।

जज: सात ही मुलांचे नाव एकच? काय थट्टा आहे का?
बाई: लाजत लाजत….ईश्य असं काय?

नाव तेच असल तरीही आडनाव सगळ्यांचं वेगळ वेगळ आहे की!
जज अजुनही कोमात आहेत ………..


वयस्कर लोकांना चांगले दिवस

अगोदर…… विक्रांत सरंजामे

आता …… अण्णा नाईक

#ratriskhelchale2


HR मॅनेजर – व्हाय शुल्ड वुई हायर यु?
चंदू : मन्या मला बोलला कि जा बिंदास…. व्हेकन्सी आहे तिकडे… गरज आहे त्यांना….जॉब देतील ते 
.
.
HR मॅनेजर आता दुसरा जॉब शोधत आहे….


रस्ते साधे होते

तेंव्हा माणसे ही साधी होती

आता,,,,,,,,

रस्ते डांबरी झाले

तेंव्हापासून
माणसे ही डांबरट झाली


एका निवडणुकीला पिंट्या उभा राहिला…!!!!

पिंट्या  ला फक्त 5 मतेच पडली

पिंट्या ने  “झेड प्लस” सुरक्षेची मागणी केली..

जिल्हा पोलिस प्रमुखांनी पिंट्याला बोलावून घेतले…
“अहो तुम्हाला तर फक्त 5 मतंच पडली आहेत आणि डायरेक्ट झेड प्लस सिक्यूरिटीची मागणी” ???

पिंट्या :–अहो, मी 50,00,000 मतांनी पडलो….
इतके लोक विरोधात आहेत
आणि तुम्ही विचारताय झेड प्लस कशाला ???

साहेब पुन्हा “IPS” ची परीक्षा द्यायला गेले….!!!!


मित्रांनो!….

कधीही कोणाची हाय घेवू नये.
परवा सकाळी शेजारीन हाय बोलली
आणि मी घेतली .

अन बायकोने बघितली.

गेल्या 3 दिवसांपासनं ढाब्यावरंच जेवतोय


इंग्रजी माध्यमात शिकणा-या लेकाने आईला विचारलं” आई ‘तडफड’ म्हणजे नेमके काय
असतं ?”
आई शांतपणे उठली आणि वायफायचा स्विच बंद केला. म्हणाली…घे अनुभव..


कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली, ‘मॅडम तुमची हि साडी परत घ्या.’
मॅडम: अरे पण का?
गंगू: मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटतं तुम्हीच आहात, ते लक्ष पण देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा करतो.


मोबाईल  वाल्यांचा नवीन म्हणी

  • आला मेसेज, केला फॉरवर्ड
  • एक न धड आणि भाराभर ग्रुपमेंबर
  • खाली मुंडी आणि व्हाट्सअँप धुंडी .
  • नको ते अँप आणि डोक्याला ताप
  • फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर
  • बुडत्या बँटरीला चार्जरचा आधार
  • स्वामी तिन्ही जगाचा, चार्जर विना भिकारी

व्हॉट्सअॅपचा सर्वात मोठा फायदा काय आहे?

अनेक महिला आपापसात बोलत असतात, पण अजिबात आवाज येत नाही.


महिलाची सर्वात मोठी समस्या…

जेव्हा त्या सून बनतात तेव्हा सासू चांगली मिळत नाही… आणि जेव्हा सासू बनतात तेव्हा सून चांगली मिळत नाही.


सून पुस्तकात बघून स्वयंपाक करत असते.

सासू – काय गं, देवघरातली घंटा फ्रिजमध्ये का ठेवलीयस?

सून – अहो, या पुस्तकात लिहिलंय…इन सब का मिश्रण बनाके फ्रिज में एक घंटा रखिये


नवरा आणि बायको
नवरा आणि बायको या दोघांची काय मस्त व्याख्या केली आहे…

आठवून आठवून भांडते… ती ‘बायको’असते…

…आणि विसल्यामुळे बोलणी खातो…… तो ‘नवरा’ असतो!!


मॅरीड लाईफ ची मजा काही औरच असते.

 खायला मिळो ना मिळो

 ऐकायला भरपूर मिळत ….!!!


केमिस्ट (संतापाने):
तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता.?


सासूबाई :- हे तुझ्या आईच घर नाही ,निट राहायचं……….

सूनबाई :- तुमच्या तरी आईचं कुठे आहे…….. तुम्हीपण नीट राहा


मुंबईहून पुण्याला जाताना नेमकं काय होतं?

…..

…..

तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते.


सासू : किचन मधून छोटी प्लेट आण जरा.

सून : कुठे आहे? दिसत नाहीये

सासू : गॅस ची शेगडी दिसतेय का?

सून : हो

सासू : ती पेटव आणि मोबाईल जाळ त्यात मग दिसेल


गण्या: ए सख्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
सख्या: अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
गण्या: म्हणजे?
सख्या: अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
गण्या: हात्तिच्या… एवढंच ना.
सख्या: हो रे… पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना…
तो खरा साप निघाला.


कावळा: चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी: थांब माझ्या बाळाला पावडर लावते…
कावळा: माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे…
बाळ: आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!


कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला
दुसऱ्या दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
…काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा: अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.


तो: प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
ती: काय करशील?
तो: तू सांगशील ते करीन!
ती: मग आधी नोकरी कर
तो: का?
ती: म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!


एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,
जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा, बंताच्या घराला टाळे लावलेले असते आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते “तुझा पोपट झालाय, चल फूट इथून”
संता खाली पडलेला खडु उचलतो आणि लिहितो
“मी आलोच नव्हतो”


आठ-दहा लोक जुगार खेळ बसले होते. तितक्यात तिथे पोलिसांची गाडी पोहोचली.

सगळ्यांची पळापळ झाली. एक जुगारी मात्र स्वतःच पळत जाऊन पोलिसांच्या गाडीत बसला.

पोलिस ; आम्ही तुला पकडण्याआधीच तू गाडीत जाऊन का बसलास?

जुगारी ; अहो, तुम्ही मागच्या वेळी पकडलं होतं तेव्हा उभं राहून जावं लागलं होतं.


मंग्या: मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुसऱ्या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे?
.
.
.
चिंगी: दैवाने दिले आणि कर्माने नेले…


‘मित्राकडे गेलो होतो गं!’ उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो.
खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या दहा मित्रांना फोन करते.
दहा पैकी पाच जण सांगतात, ‘हो, आलेला ना इथे!’
तिघे सांगतात, ‘हा काय, आत्ताच गेला…’
उरलेले दोघे म्हणतात, ‘अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?’


(संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेलं)
संता: तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने): मै बच्चे के साथ डान्स नही करती…
संता: ओ‍ह… माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस


तो: डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना, ज्याने तुझं चुंबन घेतलं?
ती: अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.


मराठी भाषा फारच अजब आहे ना…?
…गाडी ‘बिघडली’ असेल तर म्हणतात ‘बंद’ आहे.
आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात ‘चालू’ आहे…


एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली
संता (चिडून ओरडतो): तू चड्डी नाही घालत का रे?
कावळा: तू चड्डीतच करतो का रे??


आज बॅंकेचा कॅशियर बेशुध्द होता होता राहिला…
जेव्हा ४ – ५ तास लाईनमध्ये उभे राहून एक बाई दोन हजाराची नोट बघून म्हणाली
“भाऊ, याच्यात अजून कलर्स दाखवा ना”.


लोकं काय पण अफवा पसरवतात राव…
रात्री फक्त कचरा पेटवला अंगणातला…
सकाळी सगळे विचारत होते…
किती होते?


पुण्यातील एक नामवंत डॉक्टर
डॉक्टर: तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये, कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं !
पेशंट: हरकत नाही तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.


दोन मुंग्या दारु पिऊन रस्त्याने जात असतात, त्यांना एक हत्ती दिसतो.
मुंगी: त्याला हानायच का ?
दुसरी मुंगी: नको ग, लोक नाव ठेवतील एकट्याला बघून मारलं म्हणतील.


जुन्या प्रेयसीच्या लग्नाची पत्रिका मिळाली
थोडा त्रास झाला पण नंतर विचार केला…
नक्की जाणार…
प्रेम आपल्या जागी आहे आणि वरण – भात, वांग्याची भाजी आपल्या जागी…


पुण्यातली एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीवा घेऊन गॅरेज मधे जाते.
मॅकेनिक (गाडी चेक केल्यावर): मॅडम, बॅटरी बदलावी लागेल.
मुलगी: ठीक आहे.
मेकॅनिक: exide ची बसवू का ?
मुलगी(बराच विचार केल्यावर): नको, दोन्ही साईडची बसवा.
मेकॅनिक: ही अॅक्टीवा घ्या आणि कृपया घरी जा.
मेकॅनिक (मनातल्या मनात): बोर्डात ९५% मार्क होते म्हणे…


एक म्हातारा मारवाडी अखेरचे श्वास मोजत असतांना बोलतो…
म्हातारा मारवाडी: माझी बायको कुढे आहे ?
बायको: मी इथेच आहे.
म्हातारा मारवाडी: माझी मुलगी कुढे आहे ?
मुलगा: मी पण इथेच आहे.
म्हातारा मारवाडी: अरे मुर्खांन्नो मग दुकानावर कोण आहे?


लग्न मंडपात नटूनथटुन

फिरणारया मुलींना पाहून..

नवरदेवाच्या मनात विचार येतो..

या साऱ्या कालपर्यंत कुठ

.

.

मेल्या होत्या???


बायको: अहो, ऐकलंत का? मी काय म्हणतेयऽऽऽ नवरा जर मेला तर, त्याला स्वर्गात गेल्या नंतर म्हने अप्सरा मिळतात… हे खरंय का?
नवरा: हो तर…
बायको: आणि बायको मरून स्वर्गात गेल्या नंतर बायकोला कोण भेटतं?
नवरा(एकदम मुडमध्ये येऊन): बायकोला का? बायकोला तिथे माकडं भेटतात…
बायको: जळलं मेलं जीणं ते, असं कसं बायकांचं नशीब?
इथं बी माकडं अन तिथं बी माकडंच.


किर्तनकार: मुलांनो सांगा एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड ?
मुलं (एका स्वरात): लोखंड
कीर्तनकार: दोघांचही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड ?
गण्या: नाही महाराज लोखंडंच जड.
किर्तनकार (गोंधळलेल्या स्वरात): अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
मंग्या: नाही महाराज लोखंडंच जड.
किर्तनकार (चिडून): गधड्या दोघांचाही वजन सारखंच आहे.
पक्या (मिश्लिक हास्य देत): तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा, मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो.
मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते.
महाराज किर्तन सोडून विण्यासह फरार.
गण्या, मंग्या आणि पक्या हसुण – हसुन बेजार…


“एकदा एक पाटील आंघोळ करताना शाम्पू डोक्यासोबत खांद्यालाही लावत होता…”
बायको: अवं, हे काय करताय ? शाम्पू फकस्त डोस्क्याला लावायचा असतू…
पाटील: आगं येडे, हा काय साधा शाम्पू न्हवं… head & shoulders हाय…
पाटलाचा नादच खुळा…!


एका पुणेकर व्यक्तिने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली
“कामगार पाहिजे”
पात्रता – मधुमेह असला पाहिजे…


नवरा – बायको मध्ये भांडण चालु होतं…
नवरा: मी भीत नाही तुला !
बायको: भित कसं नाही ? मला बघायला येताना ५ – ६ लोकं सोबत घेऊन आला, लग्नाच्या वेळी २०० – २५० लोकं घेऊन आला, आला की नाही ?
नवरा: हो आलो…
बायको: मी बघा वाघिणी सारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते, चला भांडी घासा गप गुमाण.
नवरा: तु लय सिरीयस घेती राव, घासनी कुठंय ?


मुंबईतल्या एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये पहिल्यांदाच गेलेल्या एका पुणेरी माणसाने चहाची ऑर्डर दिली…
वेटरने उकळलेला कोरा चहा, साखर आणि गरम दुध आणून दिले…
पुणेरी माणुस कसाबसा चहा पिऊन संपवतो न संपवतो तोच त्याला वेटरने विचारले, “साहेब, आपण अजुन काही घेणार का?”
पुणेरी माणूस: “भजी खायची होती रे! पण तु कढई, तेल, बेसन आणि कांदे आणून ठेवशील… जाऊदे”


गुरुजी: “अंधारात असलेल्या मुलांकडून चुका होतात” हे वाक्य उलट अर्थी लिहा…
बंडया: अंधारात केलेल्या चुकांमुळे मुले होतात…
गुरुजींनी अंधार पडेपर्यंत मारला


एक मुलगी तोंडाला स्कार्प बांधुन स्कुटी ने चालली होती, समोरुन एक माणुस बाईकने येत होता…
तो तिला म्हणाला: “ऐ जानेमन जरा दुपट्टा हटाके चेहरा दिखाके हमारे दिलपर बिजली तो गिरा.”
मुलगी: पप्पा मी आहे…
पप्पा गाडी तिथेच सोडुन पंढरपुरच्या वारीला गेले


नवरा (बायकोला थोबाडीत मारुन म्हणाला): “पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो !”
बायको (२ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५ – २० लाटण्यांचे फटके मारुन म्हणाली): “तुम्ही काय समजता, की माझं तुमच्यावर प्रेम नाही ?”


Jokes in Marathi

एक बाई (कपडे धुताना दुसरीला): तू वापरते तोच साबण मीही वापरते, मग तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे ?
दुसरी बाई: अगं, मी कपडे धुतांना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते, म्हणून…


पेशंट: डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर: काय ?
पेशंट: जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो…! काय करू ?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा…


नवरा (खुप संतापून): फोन का नाही उचलला ?
बायको (चिडून): मी रिंगटोनवर नाचत होते…


सासू: जावईबापू, पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार ?
जावई: भिंतीवरची पाल, कारण तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते…


माणुस: केस बारीक कापा…
कटींगवाला: किती बारीक कापु ?
माणुस: बायकोच्या हातात येणार नाही इतके…


पक्या: आज मी आनंदी होता होता टेंशन मध्ये आलो यार…
गण्या: काय रे काय झालं?
पक्या: आज मी धूलिवंदनासाठी जुना शर्ट काढला आणि त्यात नेमेकी एक पाचशे रुपयाची नोट सापडली…
“नवी नव्हे जुनी…”


Jokes in Marathi

एक बाळ जन्माला आल्या – आल्या बोलायला लागतो…
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स:पोहे आणि उपीट तयार आहे…
मुलगा:अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो…


पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, “थांबा मी चहा घेऊन आलो…”
(१० मिनीटांनी)
चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया !


स्थळ: सदाशिव पेठ, पुणे.
जोशी काका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना एक लाख रुपयाची लॉटरी लागलीये !
जोशी काका: मग तुम्हाला का इतका आनंद झालांय ?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीए !


स्थळ: पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे! साधारण किती खर्च येईल ?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून): …आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?


भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????

कारण 20% मुली क्रिकेट, हॉकी,टेनिस, चेस सारखे गेमखेळतात…

80% मुली यामध्ये बिझी असतात…

जानू कुठे आहेस?..

”  काय करतोयस….

जानू कधी येशील..

” माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??

जानू आय मिस यु…..

”  आय लव यु…

जीव घ्या आता त्या जानू चा…….


पप्पा:- पिंट्या  , तुला आई जास्त आवडते का मी (पप्पा) ….??

पिंट्या  :- दोघे पण .

पप्पा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?

पिंट्या :- तरीपण दोघेच आवडतात

पप्पा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार….??

पिंट्या :- पॅरीस

पप्पा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??

पिंट्या :- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा

बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार …??

पिंट्या :- लंडनला

बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो

पिंट्या :- नाय , तस काय नाही ?

बाबा:- तर मग काय ?

पिंट्या :- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार

बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!!


काल संध्याकाली मी ज्योतिषाकडे गेलतो.

ते म्हणले की,”बाळा तु खुप शिकणार आहेस.”

मी हसायला लागलो.

ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,”बाळा,हसतोस काय,  काय झालं काय?”

.

मी बोललो,”काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की..”


मजेशीर म्हणी

1) राहायला नाही घर म्हणे लग्न कर

2)काटकसर करुन जमवलं, इंकम टॅक्समध्ये गमावलं

3) वंशाला हवा दिवा, ती म्हणते ईश्श तिकडे जावा

4) खिशात नाही डोनेशन, घ्यायला चालला ऍडमिशन

5) मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क

6) उचलला मोबाईल लावला कानाला

7)  रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार

8) ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार

9) नाजुक मानेला मोबाईलचा आधार

10)स्क्रिनपेक्षा एस एम एस मोठा

11) मनोरंजन नको रिंगटोन आवर

12) गाढवाला गुळाची चव काय

13) कुत्र्याचे शेपूट वाकडे ती वाकडेच

14) डोक्यात गजरा आणि गावभर नजरा

15) आयता बिलावर नागोबा

16) अक्कल सांगे लोकांना, शेमबुड त्याच्या नाकाला


शिक्षक – पिंट्या … सांग पाहू कंडक्टर आणि ड्रायवर मध्ये काय फरक आहे…?

पिंट्या  – कंडक्टर झोपला तर कोणाचंच तिकीट नाही निघणार..

आणि ड्रायवर जर झोपला….

तर सर्वांचच तिकीट निघेल.


मुलगी : माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस….

मुलगा : राणी एक विचारु…?

मुलगी : हो विचार ना…

मुलगा : मोबाइल डबल सिमचा तर नाही न?


शनाया:- जर मी मेले, तर तु काय करशील….???

गॅरी:- मी पण मरुन जाईन…!

शनाया (लाङात येउन):- पण का..??

गॅरी :- तुझ्या नादात एवढी उधारी झालीये

की फेङणा मुश्कील आहे….!!!

माझ्या नवऱ्याची बायको…………………………….


राधिका – अहो ऐकलं कां

आपले लग्न लावून देणारे भटजी वारले .

गॅरी – एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते.

माझ्या नवऱ्याची बायको…………………………….


नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..

बायको: अय्या… लगेच तयारी करते मी.

नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.


गुरुजी: वैज्ञानिकांनी चंद्रावर पाणी & बर्फाचा शोध लावला आहे.

आता सांगा तुम्ही यातून काय शिकाल.

पिंट्या  : सर आता फक्त आपल्याला दारू

आणि चकणा घेऊन जायच आहे.


तीन मच्छर आपापसात बोलत होते..

१ला मच्छर: मी डॉक्टर बनणार.

२रा मच्छर: मी इंजिनीयर बनणार आहे.

3रा मच्छर: मी वकील बनणार आह.

तितक्यात राणे काकू कछवाछाप लावतात.

तिन्ही मच्छर चिडून: हिच्या आईला… आख्ख्या करीअरची वाट लावली.


प्रत्येक अश्रुचा अर्थ दुःख होत नाही,

दूर राहुन कधी प्रेम कमी होत नाही,

वेळी-अवेळी होतात डोळे ओले

कारण

आमच्याकडे ‘कांदा’ कापल्याशिवाय ‘पोहे’ होत नाहीत.


We will update few more jokes in Marathi as soon as possible..


Note : All of the above jokes are taken from various sources, most of the jokes are heard from friends and received on whatsapp. So We don’t know about the author or creator of the jokes. We have just presented collection of our favorite jokes.

7 thoughts on “Jokes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top